Latest

चहाबरोबर बिस्किटे खाणाऱ्यांनो सावधान ! शरीरावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम

मंडळी, भारतात चहा आणि बिस्किट हे कॉम्बिनेशन जवळजवळ प्रत्येक घरात दिसते. पण रिफाइंड पीठ, जास्त साखर आणि ट्रान्स फॅट्स असलेली बिस्किटे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, अशी बिस्किटे वजन वाढवतात, पचनक्रिया मंदावतात आणि शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) वाढवू शकतात.

त्याऐवजी चहाबरोबर भाजलेले मखाने किंवा कुरमुरे खाणे हा अधिक आरोग्यदायी पर्याय ठरतो. मखान्यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते आणि वारंवार भूक लागत नाही.

कुरमुरे कमी कॅलरीचे असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात आणि पचनासाठीही हलके असतात. आणखी फायदेशीर बनवण्यासाठी कुरमुऱ्यांमध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू घाला.

मखाने तेलात तळण्याऐवजी हलके भाजून खा. नक्कीच हा छोटासा बदल तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी चहासोबत बिस्किटांऐवजी हेल्दी पर्याय निवडा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button