Latest

बेलापूरच्या भोंदू बाबाचा पर्दाफाश; राजकारणी, व्यापारी आणि प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर

श्रीरामपूर तालुक्यातील भोंदू बाबा गणेश माधवराव शिंदे याच्या कारवायांचा मोठा पर्दाफाश झाला असून नागरिकांच्या आजारपणासह वैयक्तिक अडचणींचा गैरफायदा घेत पैसे उकळणाऱ्या या बाबाचे जाळे देवळाली प्रवरापर्यंत पोहोचल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

शिंदे हा स्वतःला चमत्कारिक शक्ती असल्याचा दावा करत अनेकांना आपल्या जाळ्यात ओढत होता. उच्चभ्रू कुटुंबे आणि प्रभावशाली व्यक्तीही त्याच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. नगर परिषद निवडणुकांपूर्वी काही राजकीय व्यक्तींनी आपल्या राजकीय भवितव्याबाबत या भोंदू बाबाकडे सल्ला घेतल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे.

या बाबासाठी बंगला उभारण्याचा घाट काही राजकीय आणि स्थानिक मंडळींनी घातला होता. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही उभारण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या निधीत कोणकोण सहभागी होते, याची यादीही पोलिसांच्या हाती लागली असून तपास अधिक खोलात जात आहे.

दरम्यान, भोंदू बाबाच्या संपर्कात असलेले काही राजकारणी, व्यापारी आणि प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर येताच अनेक जण चौकशीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून संपर्क साधला असता काही जण ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती पुढे आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button