Latest

मे महिना लागताच UPI, ATM, क्रेडिट कार्ड ते गॅसपर्यंत…सगळे नियम बदलले, थेट खिशावर परिणाम!

१ मेपासून UPI, ATM, क्रेडिट कार्ड आणि गॅस सिलिंडरपर्यंत अनेक मोठे नियम बदलले आहेत. सर्वात आधी गॅसबद्दल बोलायचं झालं, तर व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एकाच वेळी जवळपास हजार रुपयांनी दर वाढल्यामुळे हॉटेल, केटरिंग आणि लग्नसराईत खर्च वाढणार आहे. याचा फटका थेट सामान्य नागरिकांनाही बसू शकतो.

आता UPI व्यवहारांमध्येही बदल झाले आहेत. मोठ्या रकमेचे व्यवहार करताना आता अतिरिक्त ऑथेंटिकेशन करावं लागणार आहे. म्हणजेच पेमेंट करताना एक-दोन अतिरिक्त स्टेप्स पार कराव्या लागतील. यामुळे व्यवहार अधिक सुरक्षित होतील, पण थोडा वेळ जास्त लागणार आहे.

ATM वापरणाऱ्यांनाही आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी आता २१ रुपयांऐवजी २३ रुपये शुल्क द्यावे लागेल. म्हणजेच रोख पैसे काढणंही महाग होणार आहे.

आणखी एक मोठा बदल म्हणजे गॅस सिलिंडर डिलिव्हरी. आता OTP शिवाय सिलिंडर मिळणार नाही. म्हणजेच डिलिव्हरी अधिक सुरक्षित होणार आहे, पण प्रक्रिया थोडी कडक झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button