Latest

‘त्या’ गंभीर प्रकरणात एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना अटक करून ईडी चौकशी करा ! हर्षवर्धन सपकाळ नेमक काय म्हणालेत ?

मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर आरोप करत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. सपकाळ नेमक काय म्हणालेत ? जाणून घेऊयात. आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

या ऑडिओ क्लिपमध्ये शिंदे पिता-पुत्रांचं नाव असल्याचा दावा करत, त्यांना अटक करा आणि तातडीनं ईडी चौकशी सुरू करा, अशी मागणी सपकाळ यांनी केली. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपयांचं अनुदान आणि रोजगार हमी योजना तातडीनं सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या मुद्द्यावरूनही सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत बिश्नोईला गुजरातमधून मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आणण्याचं आव्हानही त्यांनी दिलं. तुमच्या मते या प्रकरणात शिंदे पिता-पुत्रांची चौकशी व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button