
अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. जिल्ह्याला आणखी एक खासदार मिळणार का? असा मोठा प्रश्न आता चर्चेत आलाय. मंडळी, केंद्र सरकारने संसदेत परिसीमनशी संबंधित महत्त्वाची विधेयके सादर केली आहेत.
या पार्श्वभूमीवर देशभरात मतदारसंघांच्या पुनर्रचनेची चर्चा रंगली आहे. परिसीमन म्हणजे नेमकं काय? तर लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांच्या सीमा नव्याने निश्चित करणे. प्रत्येक मतदारसंघात साधारण समान लोकसंख्या राहावी, यासाठी ही प्रक्रिया केली जाते. आता हे विधेयक मंजूर झाल्यास अनेक जिल्ह्यांमध्ये लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढू शकते आणि यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव पुढे येत आहे.
सध्या जिल्ह्यात दक्षिण नगर आणि शिर्डी असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. मात्र, आता त्यात आणखी एक मतदारसंघ वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही नेत्यांनीही याबाबत संकेत दिल्यामुळे या चर्चेला अधिक जोर आला आहे.
नवीन मतदारसंघ कोणता असेल, कोणत्या भागांचा समावेश होईल, नवीन कोण खासदारकीचा दावेदार असेल? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. मंडळी, तुमचा काय अंदाज आहे? कमेंटमध्ये व्यक्त व्हा..





