Latest

अहिल्यानगर ब्रेकिंग ! ‘या’ गावात लाठ्याकाठ्यांनी मारहाण; शेतकऱ्याचा मृत्यू

अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीये. जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे लाठ्या आणि लोखंडी गजांनी झालेल्या मारहाणीत एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झालाय.

मंडळी, मुरलीधर दगडू मोहळकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. १२ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गावातीलच काही जणांनी घरासमोर येत वाद घालत शिवीगाळ केली आणि त्यानंतर हा वाद थेट मारहाणीपर्यंत गेला.

आरोपींनी लाठ्या, लोखंडी गज आणि लाथाबुक्यांनी मोहळकर कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात मुरलीधर मोहळकर यांना डोक्यात, छातीत आणि पाठीवर गंभीर मार लागला. त्यांच्यावर अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तीन दिवसांनी, १५ एप्रिल रोजी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

खर्डा पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आणि केवळ २४ तासांत मुख्य आरोपी रविंद्र शिंदे याला अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button