
दोन मुलांची आई, संसाराची स्वप्नं आणि अचानक झालेला मृत्यू ! शेवगावच्या शिफा शेखसोबत नेमकं काय घडलं? तिच्या आईने केलेले आरोप ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, शिफा हिचा विवाह २०१८ मध्ये अल्ताफ अन्सार शेख याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर हुंड्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप आई अफ्रोजा शेख यांनी केला आहे.
शिफाची प्रकृती बिघडलेली असतानाही सासरच्यांनी वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात नेलं नाही, असं तक्रारीत म्हटलं आहे. अखेर १६ ऑगस्टला तिला माहेरी आणण्यात आलं. त्यानंतर अहिल्यानगर आणि पुण्यातील रुग्णालयांत उपचार सुरू झाले.
मात्र, १९ ऑगस्ट २०२६ रोजी तिचा मृत्यू झाला. आता पती अल्ताफसह सासरच्या नऊ जणांविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आईने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
मात्र, या आरोपांची सत्यता पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे. तर मग मंडळी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.





