Latest

अहिल्यानगरचा पैलवान भारतात तिसरा ! निलेश उचाळेची राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई

“छोट्या गावातून राष्ट्रीय मंचापर्यंत… अहिल्यानगरच्या या पैलवानाने महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने फडकावलाय !”
मंडळी, हरियाणातील रोहतक येथे झालेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शिरापूरचा पैलवान निलेश उचाळे याने शानदार कामगिरी करत 82 किलो वजनगटात देशात तिसरा क्रमांक मिळवला आहे.

या यशासह त्याने कांस्यपदक पटकावत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. निलेश सध्या भाळवणी येथील गुरुकुल कुस्ती संकुलात प्रशिक्षक पैलवान गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव करत आहे. त्याचबरोबर तो संगमनेर तालुक्यातील सीताई कला व विज्ञान महाविद्यालयात पदवीचे शिक्षणही घेत आहे.

जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात भारताचे प्रतिनिधित्व करत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिरंगा उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button