Latest

अहिल्यानगर हादरलं ! वाहनाच्या काचा फोडल्याने तरुणाचा निर्घृण खून

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका एका खुनाच्या घटनेने हादरलाय. वाहनाच्या काचा फोडल्याच्या जुन्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

मंडळी, धामणगाव येथील किरण आप्पासाहेब काकडे, वय ४०, यांचा १७ ते १८ जून दरम्यान अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून खून केला होता. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मृताचे पत्नी कांता काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी गोपनीय माहिती, स्थानिक चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरली. तपासादरम्यान काही दिवसांपूर्वी किरण काकडे यांनी नितीन तोडकर यांच्या वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्या होत्या. याच रागातून आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केल्याचे उघड झाले.

पोलिसांनी विशाल भोसले, अमोल पवार, सत्यम जेथे आणि चैतन्य भोसले या आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मंडळी, क्षणिक राग आणि सूडाची भावना किती भयंकर परिणाम करू शकते, याचे हे आणखी एक उदाहरण आहे. तुम्हाला काय वाटत?कमेंट करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button