Latest

अहिल्यानगर जिल्हा बनलाय राजकारणाची प्रयोगशाळा ! जिल्ह्यात एकूण १७ आमदार, आता १८ वा आमदार कोण होणार ?

राज्यातील सर्वात मोठी राजकीय प्रयोगशाळा म्हणून आता अहिल्यानगरकडे पाहिलं जात आहे. कारण इथल्या राजकारणात सतत नवे प्रयोग, धक्कातंत्र आणि अनपेक्षित समीकरणं पाहायला मिळत आहेत.

सध्या जिल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघ असले तरी विधान परिषदेसह एकूण १७ आमदार कार्यरत आहेत. त्यामुळे आता “१८वा आमदार कोण?” याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे. कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांसोबत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि सुनील कर्जतकर असे तीन आमदार सक्रिय आहेत.

संगमनेरमध्ये अमोल खताळ आणि सत्यजित तांबे, तर पाथर्डीत मोनिका राजळे आणि शिवाजीराव गर्जे अशी दुहेरी ताकद दिसतेय. कोपरगावमध्येही आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे या दोन्ही नेत्यांना आमदारकी मिळाल्याने राजकीय समीकरणं अधिकच रंगली आहेत.

महायुती सरकारने गेल्या काही वर्षांत नगरमध्ये अनेक राजकीय प्रयोग केले. त्यामुळे राज्यात कोणताही मोठा निर्णय घेताना अहिल्यानगरचा विचार महत्त्वाचा मानला जातो. आता पुढचा राजकीय प्रयोग कोणता आणि १८वा आमदार कोण होणार ? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button