Latest

अहिल्यानगर ब्रेकिंग ! आश्रमशाळेतील मुलीचा विनयभंग; शिक्षकाला अटक

शाळा म्हणजे सुरक्षित जागा… पण इथेच धक्कादायक प्रकार घडलाय शासकीय आश्रमशाळेत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आणि या प्रकरणी आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित मुलीने धाडस दाखवत आश्रमशाळेच्या अधीक्षक आणि मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकरणाची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आली. प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर राजूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि त्याला अटक केली.

गणेश पंढरीनाथ कोकाटे असे या आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंडळी, अशा घटना अत्यंत गंभीर आहेत आणि यामध्ये दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. तुमच्या काय मत आहे? कमेंट करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button