Latest

भोंदू अशोक खरात प्रकरणात भयानक ट्विस्ट…! खरातचे संबंध थेट परराज्यातील महिलांसोबत, शिर्डीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये नेमक काय चालायचं ?

अशोक खरात प्रकरणाच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत असलेल्या खरातचे कथित संबंध केवळ नाशिक आणि अहिल्यानगरपुरते मर्यादित नसल्याचे तपासातून समोर आल्याची माहिती आहे.

काही परराज्यातील महिलांशीही त्याचे खासगी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या महिलांच्या भेटीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

नाशिक-शिर्डी महामार्गावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काही गुप्त भेटी झाल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाल्याचे सांगितले जाते.

विशेष म्हणजे, काही महिला धार्मिक विधी, पूजा किंवा शिर्डी दर्शनासाठी जात असल्याचे कुटुंबीयांना सांगत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष भेटींबाबत घरच्यांना कल्पना नसल्याचा दावा आहे. मात्र, या सर्व बाबी तपासाचा भाग असून अधिकृत तपासानंतरच सत्य स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button