
अकोले तालुक्यातील राजूरजवळ झालेल्या भीषण अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. नेमका हा अपघात कसा घडला? सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, शनिवारी, २८ नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास माणिक ओझर शिवारात हा अपघात झाला. राजूरकडून जाणारी शाईन मोटारसायकल आणि समोरून येणारी मुंबई पर्यटकांची मोटारसायकल यांची जोरदार धडक झाली.
या अपघातात पुरुषवाडी येथील किसान पंढरीनाथ भांगरे (वय ३५), पांडुरंग सोमा कोंडार आणि मवशी येथील संदीप शंकर भांगरे या तिघांचा मृत्यू झाला. रात्री दहाच्या सुमारास तिघांनाही राजूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेची राजूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली असून, पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तर मग मंडळी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.





