Latest

७२ वर्षीय महिलेच्या पोटात चक्क १५ किलोची गाठ… ऑपरेशन झाल आणि त्यानंतर… नगरच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये काय घडलं ?

वयाच्या ७२ व्या वर्षी पोटात तयार झाली तब्बल १५ किलो वजनाची गाठ ! श्वास घेणंही कठीण झालं, पण अहिल्यानगरच्या डॉक्टरांनी मोठं आव्हान पेललं. नेमकं काय घडलं ? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, अहिल्यानगरमधील डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ही अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. महिलेच्या पोटात अंडाशयाची मोठी गाठ तयार झाली होती. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यासोबतच लघवी आणि शौचासही त्रास होत होता.

तपासणीनंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, ही गाठ आजूबाजूच्या अवयवांना चिकटलेली होती. कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. अद्वैत वैद्य आणि मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. दीपक गाडेकर यांनी तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करून १५ किलोची गाठ बाहेर काढली. आता महिलेची प्रकृती सुधारत आहे. तर मग मंडळी तुम्हाला नगरच्या डॉक्टरांची ही कामगिरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button