
अहिल्यानगर शहरातील बोलहेगाव परिसरात चार वर्षांचा साई विशाल पवार याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी साई हा बोलहेगावमधील भारत बेकरीजवळील आंबेडकर चौक परिसरात असताना अचानक पाण्यात बुडाला.
ही घटना लक्षात येताच त्याचे वडील विशाल वसंत पवार यांनी तातडीने त्याला शहरातील इंपल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर साईला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.
म्हणून पावसाळ्याच्या दिवसांत लहान मुलांना पाण्याजवळ एकटे सोडू नये आणि त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे, असा सल्ला दिला जात आहे.





