
अहिल्यानगर शहराचा चेहरामोहरा बदलणार का? महापालिकेने आता विकास प्रकल्पांना मोठी गती देण्याची तयारी सुरू केली आहे. शहरातील ३० महत्त्वाच्या रस्त्यांसाठी तब्बल २५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. यासोबतच नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी ५०० कोटींच्या सुधारित पाणी योजनेचाही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
याशिवाय सीना नदीचे सुशोभीकरण, भव्य उद्यान, पिंपळगाव मालवी येथे वेस्ट टू वंडर पार्क, प्रोफेसर चौक आणि गंजबाजार परिसरातील व्यावसायिक प्रकल्प, तसेच उपनगरांसाठी भुयारी गटार योजना राबवण्याचे नियोजन आहे.
शहरातील गॅस पाइपलाइनचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी महापालिकेचे सहकार्य सुरू असून, मनपाच्या शाळांमध्ये ई-लर्निंग आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचाही निर्णय आहे. जर हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण झाले, तर नगरच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते. या योजनांबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.





