
पंढरपूरच्या दर्शनासाठी निघालात? मग आधी तुमचं बजेट तपासा… कारण एसटीचा प्रवास आता आणखी महाग झाला आहे.
मंडळी, १७ जुलैच्या मध्यरात्रीपासून एसटी महामंडळाने नवीन भाडेवाढ लागू केली असून साध्या बसच्या तिकीटदरात एकूण १३.५६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम रोज प्रवास करणारे प्रवासी, विद्यार्थी आणि भाविकांवर होत आहे.
अहिल्यानगरहून पुण्याला जाण्यासाठी आता २४० रुपये, पंढरपूरसाठी तब्बल ४०० रुपये, तर नाशिकसाठी ३३५ रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय मुंबईचे भाडे ५५० रुपये, सुरत ६५० रुपये, छत्रपती संभाजीनगर २२० रुपये आणि शिर्डीसाठी १७५ रुपये इतके झाले आहे.
महामंडळाने डिझेल दरवाढ आणि वाढता खर्च यामागील कारणे सांगितली असली, तरी या निर्णयामुळे सामान्य प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
विशेष म्हणजे आता तिकीटदर ५ रुपयांच्या पटीत निश्चित करण्यात आल्याने सुट्ट्या पैशांचाही प्रश्न संपला आहे. तुमच्या मते ही भाडेवाढ योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.





