
रेशन कार्डधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मोठी कारवाई करत तब्बल ५६ हजार ७६३ शिधापत्रिका अन्नसुरक्षा योजनेतून वगळल्या आहेत. त्यामुळे सुमारे २ लाख ८५ हजार लाभार्थ्यांचे मोफत रेशन बंद झाले आहे.
मंडळी, केंद्र सरकारच्या ‘मिशन सुधार’ या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. मोफत धान्याचा लाभ फक्त पात्र नागरिकांनाच मिळावा आणि धान्याचा काळाबाजार थांबावा, हा या मोहिमेचा उद्देश आहे.
पडताळणीदरम्यान अपात्र, दुबार, मृत, स्थलांतरित आणि अनेक वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या शिधापत्रिका आढळून आल्या. त्यामुळे या शिधापत्रिका थेट रद्द करण्यात आल्या आहेत.
सर्वाधिक शिधापत्रिका वगळण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, पुणे, रायगड आणि छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातूनही शिधापत्रिका वगळण्यात आल्या असून, जिल्हा पुरवठा विभागाकडून पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे.
सरकारच्या माहितीनुसार, अनेक कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न वाढले आहे, काही जण पेन्शनधारक आहेत, तर काही लाभार्थी मृत किंवा स्थलांतरित असूनही त्यांच्या नावावर मोफत धान्य घेतले जात होते. त्यामुळे अशा शिधापत्रिका योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणूनच, जर तुम्ही रेशन कार्डधारक असाल, तर तुमची शिधापत्रिका पात्र आहे का, याची खात्री करून घ्या.ही महत्वाची माहिती इतरांपर्यंतही पोहोचवा.





