Latest

अहिल्यानगरला मिळणार देशातील सर्वात मोठा उन्नत महामार्ग ! नगर – पुणे प्रवास होणार सुपरफास्ट

पुणे ते अहिल्यानगर आणि पुढे छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे-शिरूर उन्नत महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन होत असून, या प्रकल्पामुळे पुणे-शिरूर मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

५३.४ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात ३५ किलोमीटरचा सहापदरी उन्नत महामार्ग उभारला जाणार आहे. तसेच विद्यमान रस्त्याचेही सहापदरीकरण केले जाणार आहे. वाघोली परिसरात रस्ता आणि मेट्रोसाठी दुमजली उड्डाणपूलही उभारला जाणार आहे.

या प्रकल्पामुळे पुणे, शिरूर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यातील प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होईल. उद्योग, व्यापार, शिक्षण आणि दैनंदिन प्रवासालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

सुमारे ७,५१५ कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, पूर्ण झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कनेक्टिव्हिटीला नवी दिशा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button