Latest

कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी ! पारनेर बाजार समितीत कांद्याचे भाव 3 हजार पार

कांद्याला भाव मिळत नाही, अशी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पारनेरमधून दिलासादायक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी झालेल्या लिलावात चांगल्या प्रतीच्या गावरान कांद्याला तब्बल ३१ रुपये प्रति किलोचा उच्चांकी दर मिळाला. विशेष म्हणजे बाजारात कांद्याची मोठी आवक असूनही भाव टिकून राहिल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

लिलावात हजारो गोण्यांची विक्री झाली असून विविध दर्जाच्या कांद्यालाही चांगला बाजारभाव मिळाला. व्यापाऱ्यांकडून दर्जेदार मालाला अधिक पसंती मिळत असल्याने कांदा निवडून बाजारात आणण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि केरळसह विविध राज्यांतून वाढलेल्या मागणीमुळे पारनेर बाजार समितीतील कांद्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी शेतावरच व्यवहार करण्याऐवजी थेट बाजार समितीत कांदा विक्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आता आठवड्यातील तीन दिवस नियमित कांदा लिलाव होत असल्याने शेतकऱ्यांना विक्रीची अधिक सुविधा उपलब्ध झाली आहे. तुमच्या भागात आज कांद्याला किती दर मिळाला? कमेंट करून नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button