Latest

पश्चिम बंगालप्रमाणे अहिल्यानगरमध्ये पण SIR ! जिल्ह्यातील ३८ लाख मतदारांची घरी जाऊन पडताळणी; तुमचं नाव यादीत आहे का ?

तुम्ही मतदान करता, पण तुमचं नाव मतदार यादीत योग्य आहे याची खात्री आहे का? कारण आता अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल ३८ लाख मतदारांची प्रत्यक्ष घरी जाऊन पडताळणी होणार आहे!

भारत निवडणूक आयोगाने विशेष पुनरीक्षण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू केला असून, २१ जूनपासून बीएलओ अधिकारी घरोघरी भेट देणार आहेत. या मोहिमेदरम्यान मतदारांची माहिती, नाव, फोटो आणि इतर नोंदी तपासल्या जाणार आहेत.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील सुमारे ३ लाख ९२ हजार मतदारांच्या नावांमध्ये किंवा फोटोंमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. तसेच जवळपास ५ लाख ९० हजार मतदार अद्याप मॅपिंग प्रक्रियेबाहेर असल्याचे समोर आले आहे.

घर बंद असल्यास बीएलओ किमान तीन वेळा भेट देणार आहेत. त्यामुळे घरात येणाऱ्या अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, त्याआधीच आपली माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या. कारण लोकशाहीतील तुमचा सर्वात मोठा अधिकार म्हणजे तुमचं मत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button