
जून महिन्यात बँकेचं काम करण्याचा प्लॅन करत असाल, तर आजचा हा व्हिडीओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा राहणार आहे. मंडळी, आरबीआयने जून 2026 मधील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली असून या महिन्यात देशभरातील बँका एकूण 11 दिवस बंद राहणार आहेत.
दर रविवारी म्हणजे 7, 14, 21 आणि 28 जूनला साप्ताहिक सुट्टी असेल. तसेच 13 जूनला दुसरा शनिवार आणि 27 जूनला चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. याशिवाय काही प्रादेशिक आणि धार्मिक सणांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्या असतील.
15 जूनला अझिवल आणि भुवनेश्वरमध्ये विशेष सुट्टी राहणार आहे. मोहरम निमित्त 25 जूनला विजयवाड्यात तर 26 जूनला मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, पाटणा आणि श्रीनगर येथे बँका बंद असतील.
मात्र काळजीचं कारण नाही. UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि ATM सेवा सुरू राहतील. पण चेक जमा करणे, खाते उघडणे किंवा कर्जासंबंधी काम असेल तर सुट्टीची तारीख आधी तपासूनच बँकेत जा.





