
“मित्रहो, आता गाडीची टँक फुल करायची म्हटलं, तर आधी पंपावर गर्दी पाहावी लागते आणि मग खिशाला हात लावून बजेट सुद्धा पाहावं लागतंय !” कारण मागील १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल ४ वेळा वाढ झाली आहे.
२५ मे रोजी पुन्हा दरवाढ झाली असून, पेट्रोल प्रति लिटर २.६१ रुपयांनी तर डिझेल २.७१ रुपयांनी महागले आहे. यामुळे अहिल्यानगरमध्ये पेट्रोलचा दर १११.५७ रुपये तर डिझेल ९८.२५ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. ब्रेंट क्रूड ९८ डॉलरपर्यंत खाली आले आहे.
तरीही भारतात दर वाढण्यामागे रुपयाची घसरण, आयात खर्च आणि पश्चिम आशियातील तणाव ही प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. १५ मेपासून सुरू झालेल्या या दरवाढीत पेट्रोल जवळपास ८ रुपये प्रति लिटरने महागले आहे. यासोबतच सीएनजीच्या दरातही वाढ झाली असून नगरमध्ये सीएनजी १०१.८४ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे.
याचा थेट परिणाम सामान्य नागरिक, प्रवासी, वाहतूक व्यवसाय आणि महागाईवर होणार आहे. तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचा रेट कसा आहे ? कमेंटमध्ये नक्की सांगा.





