
“सकाळी उठताच मोबाईल पाहता? दिवसभर बसून काम करता? मग तुमचं हृदय धोक्यात असू शकतं!”
आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीच्या सवयींमुळे कमी वयातही हृदयविकाराचा धोका वाढताना दिसतो आहे. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ Dr. Sanjay Bhojraj यांनी हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या पण महत्त्वाच्या सवयी सांगितल्या आहेत.
डॉक्टरांच्या मते, सकाळी उठताच मोबाईल पाहण्याऐवजी काही वेळ नैसर्गिक सूर्यप्रकाशात फिरणं फायदेशीर ठरतं. तसेच रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिण्याऐवजी प्रोटीनयुक्त नाश्ता करणं गरजेचं आहे.
दुपारच्या जेवणानंतर किमान 10 मिनिटं चालल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीरातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. जेवणात प्रोटीन, भाज्या, फायबर आणि हेल्दी फॅट्सचा समावेश असणंही महत्त्वाचं मानलं जातं.
संध्याकाळी चालणं, योग किंवा हलका व्यायाम शरीर सक्रिय ठेवतो. तर रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलपासून दूर राहून ‘डिजिटल डिटॉक्स’ करणं चांगल्या झोपेसाठी आवश्यक आहे.
मंडळी लक्षात ठेवा… निरोगी हृदय एका दिवसात नाही, तर रोजच्या चांगल्या सवयींमधून तयार होतं !





