Latest

अहिल्यानगर ब्रेकिंग ! भीषण अपघातात आख्ख कुटुंब मृत

अहिल्यानगरमधून एक अत्यंत दु:खद आणि हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. भीषण अपघातात एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मंडळी, पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील शेख कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. आई, वडील, मुलगा आणि मुलगी अशा चौघांचा गुजरातमधील भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, फारुख शेख हे वापी येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होते. ५ मे रोजी ते पत्नी शबाना, मुलगा आरिफ आणि मुलगी नाजिया यांच्यासह स्वतःच्या कारने आपल्या मूळ गावी येत होते.

दरम्यान गुजरातमधील सुथारपाडा परिसरात त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की पत्नी शबाना शेख आणि मुलगा आरिफ शेख यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर जखमी अवस्थेत फारुख शेख आणि मुलगी नाजिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच फारुख शेख यांचाही मृत्यू झाला.

तर मुलगी नाजिया हिने तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिली पण अखेर ११ मे रोजी तिचीही प्राणज्योत मालवली. एका क्षणात संपूर्ण कुटुंब संपल्याने पाथर्डीकर हळहळ व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button