Latest

१ एप्रिल २०१९ पूर्वीची गाडी आहे? मग हे नियम जाणून घ्या

१ जुलैपासून रस्त्यावर उतरताना सावध ! तुमच्या गाडीवर ही नंबर प्लेट नसेल, तर थेट ₹1000 दंड बसू शकतो… आणि राज्यभर विशेष तपासणी मोहीमही सुरू होणार आहे!

१ जुलै २०२६ पासून महाराष्ट्रातील वाहनधारकांवर मोठी कारवाई होणार आहे. राज्य सरकारने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) अनिवार्य केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासाठी ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदत दिली असून, त्यानंतर नियम मोडणाऱ्यांवर थेट दंड आकारला जाणार आहे.

सरकारकडून राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून, HSRP प्लेट नसलेल्या वाहनधारकांकडून मोटार वाहन कायद्यानुसार १००० रुपयांपर्यंत दंड वसूल केला जाईल. वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही प्रणाली लागू करण्यात आली आहे.

वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करून Appointment घ्यावे आणि अधिकृत केंद्रावर प्लेट बसवून घ्यावी. शासनाने अनधिकृत एजंटपासून सावध राहण्याचे आवाहनही केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button