Latest

सावधान ! उन्हात धावत्या वाहनांना लागतेय आग, ‘अशी’ खबरदारी घ्या..

सावधान ! कडक उन्हामुळे आता धावत्या वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढत आहेत आणि हा धोका तुमच्याही वाहनाला लागू शकतो. मंडळी, सध्या तापमान ४० ते ४१ अंशांच्या पुढे जात आहे. अशा वेळी वाहनांचे इंजिन, वायरिंग आणि बॅटरीवर मोठा ताण येतो. गेल्या काही दिवसांत कार, दुचाकी, ट्रक आणि ई-वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

वाहनांना आग लागण्यामागची कारणंही तितकीच गंभीर आहेत. खराब वायरिंग, बॅटरीतील दोष, इंधन गळती, इंजिन ओव्हरहिट होणं किंवा निकृष्ट स्पेअर पार्ट्सचा वापर आदी. या सगळ्यामुळे शॉर्टसर्किट होऊन वाहन पेट घेऊ शकतं.

विशेषतः ई-वाहनांमध्ये बॅटरी ओव्हरहिट झाल्यास आग वेगाने पसरते. तर CNG आणि LPG वाहनांमध्ये गॅस गळती झाल्यास मोठा स्फोट होण्याचीही शक्यता असते.

म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, वाहनाची वेळेवर सर्व्हिसिंग करा, वायरिंग आणि बॅटरी तपासा, अनधिकृत मॉडिफिकेशन टाळा आणि शक्यतो वाहन उन्हात उभं ठेवू नका. वाहनातून जळल्यासारखा वास येणे, इंजिनजवळून धूर दिसणे, बॅटरी पटकन गरम होणे किंवा डॅशबोर्डवर वॉर्निंग लाइट लागणे हे संकेत दुर्लक्षित करू नका. मंडळी, छोटासा निष्काळजीपणा मोठा अपघात घडवू शकतो. त्यामुळे सतर्क राहा आणि सुरक्षित राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button