Latest

जनगणनेत खोटी उत्तरे, माहितीस नकार दिल्यास आता दाखल होणार गुन्हा ! हजाराचा दंडही

जनगणनेबाबत एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. आता जनगणनेत चुकीची माहिती दिली किंवा माहिती देण्यास नकार दिला, तर थेट गुन्हा दाखल होऊ शकतो आणि हजार रुपयांपर्यंत दंडही भरावा लागू शकतो.

मंडळी, देशाच्या विकासासाठी महत्वाची असलेली जनगणना प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या वेळी काही मोठे बदल करण्यात आले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे, यंदाची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार आहे आणि त्यासाठी विशेष मोबाईल अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे.

पण इथेच एक मोठा नियम लागू करण्यात आलाय.. जनगणना कायदा १९४८ नुसार, प्रगणकाने विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणे प्रत्येक नागरिकासाठी बंधनकारक आहे. जर कोणी माहिती देण्यास टाळाटाळ केली किंवा जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली, तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

अशा प्रकरणात संबंधित व्यक्तीला एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आणि गंभीर प्रकरणांमध्ये ही शिक्षा वाढून थेट तीन वर्षांच्या तुरुंगवासापर्यंत जाऊ शकते. म्हणूनच नागरिकांनी योग्य आणि खरी माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे. मंडळी, ही माहिती अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे जनगणनेत सहकार्य करा आणि योग्य माहिती द्या आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button