
कर्जदारांसाठी मोठी खुशखबर आहे, आता १० लाखांपर्यंत विनातारण कर्ज मिळणार आहे; पण दुसरीकडे पतसंस्थांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. मंडळी, महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता पतसंस्थांमधून दिल्या जाणाऱ्या विनातारण कर्जाची मर्यादा वाढवण्यात आलीये.
या नव्या नियमानुसार लहान संस्थांमध्ये किमान १ लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळू शकणार आहे. तर मोठ्या, म्हणजेच १००० कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या संस्थांमध्ये ही मर्यादा थेट १० लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
इतकंच नाही, तर वैयक्तिक कर्ज मर्यादा काही ठिकाणी ३ कोटी रुपयांपर्यंत, आणि समूह किंवा कंपनी कर्ज मर्यादा ५ कोटी रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. या निर्णयाने छोट्या व्यावसायिकांना आणि गरजू लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
मात्र, या निर्णयामुळे पतसंस्थांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कारण विनातारण कर्ज वाढल्यास परतफेडीचा धोका वाढू शकतो. आणि जर कर्ज वसूल झालं नाही, तर थेट संस्थांच्या ठेवींवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आता हा नवा नियम प्रत्यक्षात किती यशस्वी ठरतो आणि याचा परिणाम काय होतो, हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करा..





