
आमदार सत्यजित तांबे यांनी शिक्षण विभागातील कथित गोंधळ आणि बोगस कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. दादा भुसे यांच्या अखत्यारीतील या खात्यात खडूंपासून शिक्षक भरतीपर्यंत आणि फाईल्सपासून नियोजनापर्यंत मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा असल्याचा आरोप केला जातो आहे.
या गोंधळाचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आमदार तांबे यांनी शिक्षण आयुक्तांना पत्र देत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
मात्र ठोस पावले उचलली नाहीत, तर २५ मेपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता हा मुद्दा केवळ आरोपांपुरता मर्यादित न राहता राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे.
मंडळी तुम्हाला काय वाटत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आता खरंच कठोर पावलं उचलण्याची वेळ आली आहे का?





