Latest

एलपीजी ४२ रुपयांवरून १२० रुपये किलो ! अहिल्यानगरमध्ये रिक्षाचा प्रवास महागला,नागरिकांना परवडेना

अहिल्यानगरमध्ये रिक्षाने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.. आता रिक्षा प्रवास महाग झालाय आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे एलपीजी गॅसचे तिप्पट झालेले दर. मंडळी, काही दिवसांपूर्वीपर्यंत एलपीजी गॅसचा दर सुमारे ४२ ते ४३ रुपये प्रतिकिलो होता.

पण आता हाच दर थेट १२० रुपयांवर पोहोचलाय. म्हणजेच जवळपास तिप्पट वाढ झाली आहे. युद्धामुळे हे सगळं झालय. या दरवाढीचा थेट परिणाम रिक्षाचालकांवर झाला आहे. अहिल्यानगरमध्ये बहुतांश रिक्षा एलपीजीवर चालतात.

कारण हे इंधन स्वस्त आणि किफायतशीर मानले जात होते. पण आता दरवाढ आणि टंचाईमुळे रिक्षाचालकांचे गणितच बिघडले आहे. याचा परिणाम प्रवाशांवरही दिसू लागला आहे. जिथे आधी १० रुपये लागत होते, तिथे आता २० रुपये द्यावे लागत आहेत. ठरावीक भाड्यातही २० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे चित्र आहे.

अहिल्यानगर शहरात सुमारे सहा हजार रिक्षा आहेत, आणि त्यातील मोठा भाग एलपीजीवर चालतो. म्हणूनच आता रिक्षाचालकांसमोर दरवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. आणि त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांच्या खिशाला बसत आहे. मंडळी, ही परिस्थिती पुढे आणखी गंभीर होणार का, की सरकार काही दिलासा देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button