Latest

श्रीरामपूर जिल्हा करण्याची पुन्हा आग्रही मागणी विराट हिंदू संमेलनात नेमकं काय झालं?

श्रीरामपूर तालुक्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन द्यायचे असेल तर शहराला जिल्हा घोषित करावा, अशी मागणी श्रीरामपूर येथे झालेल्या विराट हिंदू संमेलनात करण्यात आली. या संमेलनाला आयोध्या मंदीराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरीजी महाराज, सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र संचालक डाँ. जयंतीभाई भाडेसिया आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात उद्योजक बाबासाहेब काळे यांनी श्रीरामपूर जिल्हा करावा, अशी आग्रही मागणी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महंत रामगिरी महाराज यांनीही समाजातील विकृतीवर आपल्या भाषणातून प्रहार केला. श्रीरामपूरमधील लव्ह जिहादच्या घटना व झेंडा मिरवणुकीवर होणारी दगडफेक याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या हिंदू समेलनासाठी वारकरी सांप्रदाय, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदूत्ववादी इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button