
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून चोरीची मोठी घटना समोर आली आहे. अळकुटी गावातील घोलप मळ्यात चोरट्यांनी तब्बल ७० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेलाय. नेमकी कशी घडली घटना? सविस्तर सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, रविवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. यशवंत बाळाजी घोलप यांच्या घरात कुटुंबातील सदस्य तीन खोल्यांमध्ये झोपले होते. मात्र, एका खोलीत सोयाबीनचे कट्टे असल्यामुळे तिथे कोणीही झोपलेलं नव्हतं.
चोरट्यांनी नेमकी हीच संधी साधली. घराच्या मुख्य दरवाजाची आतील कडी उचकटून आत प्रवेश केला आणि संबंधित खोलीतील कपाट फोडलं. त्यानंतर तब्बल ३१ तोळे सोनं, अर्धा किलो चांदी आणि सव्वादोन लाख रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले.
पहाटे साडेपाच वाजता चोरी उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून चोरट्यांच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहेत. तर मग मंडळी, तुमच्या परिसरातही अशा घटना घडत आहेत का? कमेंट करून नक्की सांगा.





