
जिथं गुन्हेगारांना शिक्षा भोगावी लागते, त्याच कारागृहात पोलिसांनाच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये समोर आला आहे. नेमकं काय घडलं ? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी अहिल्यानगरच्या जिल्हा कारागृहात पोलीस कॉन्स्टेबल मयूर धामोरे हे शासकीय कर्तव्य बजावत होते. यावेळी निलेश जाधव नावाचा कैदी पाण्याच्या टाकीमागे लपलेला आढळला. त्याला याबाबत विचारणा केली असता त्याने अरेरावी सुरू केली. त्यानंतर त्याने इतर कैद्यांना बोलावले.
विजय पठारे, गणेश पोटे, मयूर आगे आणि अबूझर लतिफ यांनीही त्याला साथ दिली. गांजा पिण्यास मज्जाव केल्याचा राग मनात धरून या कैद्यांनी पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत मारहाण केली.
एवढंच नाही, तर बाहेर आल्यावर संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पाचही जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.





