Latest

विधान परिषद निवडणुकीच्या निकालात धक्कादायक ट्विस्ट ! पाहा कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर ?

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मंगळवारी सुरू झालेली मतमोजणी रात्री उशिरापर्यंत पूर्ण झाली नाही. त्यामुळे बुधवारीही मतमोजणी सुरू राहणार आहे. आता पाहूया, कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर आहे! पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख-जाधव यांना १ लाख १२ हजार ३७७ मतं मिळाली आहेत. नागपूरमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे ६० हजार ९२४ मतांसह आघाडीवर आहेत. मराठवाड्यात महाविकास आघाडीचे प्रतापसिंह पाटील यांना ७८ हजार ५४० मतं मिळाली आहेत.

शिक्षक मतदारसंघात पुण्यात भाजपचे कौस्तुभ गावडे १७ हजार ५४३ मतांसह, तर अमरावतीमध्ये महायुतीचे किरण सरनाईक ८ हजार ४३८ मतांसह आघाडीवर आहेत.

या निवडणुकीत एकूण १८२ उमेदवार रिंगणात आहेत. पसंतीक्रमानुसार मतमोजणी सुरू असल्याने अंतिम निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण मंडळी, या निकालांचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार? तुम्हाला काय वाटतं ? हे कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button