Latest

मोठी बातमी : अहिल्यानगर जिल्ह्यातील या तालुक्यात शिवस्मारक उभारले जाणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे. काय म्हणालेत मंत्री महोदय? सगळं सांगतो. पण आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका.

मंडळी, आता अहिल्यानगरच्या प्रत्येक तालुक्यात शिवरायांच स्मारक उभारण्यात येणार आहे. महायुती सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या निर्णयानुसार, पहिलं स्मारक श्रीरामपूरमध्ये, तर दुसरं स्मारक कोल्हारमध्ये उभारण्यात आलं आहे. सोमवारी रात्री कोल्हारमध्ये शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी विखे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलव्यवस्थापनाचाही उल्लेख केला.

आजच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचं संवर्धन आणि उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करण्याची प्रेरणा शिवरायांच्या कार्यातून मिळते, असं ते म्हणाले.

विशेष म्हणजे, स्मारक समितीने दुष्काळ सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेशही सुपूर्द केला. मंडळी, तुमच्या तालुक्यातही शिवस्मारक उभारलं पाहिजे का? कमेंट नक्की करा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button