Latest

डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या डोक्यावर पंचा, पंकजा मुंडे उठून आल्या आणि त्यानंतर….. दसरा मेळाव्यातला VIDEO चर्चेत!

सुजय विखे भाषणाला उभे राहिले अन् पंकजा मुंडेंनी त्यानंतर डोक्यावरचा पंचा काढला ! मग पुढे जे घडलं, त्यानं मैदानात एकच जल्लोष झाला. दसरा मेळाव्यात नेमक काय झालं? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, भगवान भक्ती गडावरील मंत्री पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली होती. उन्हाचा तडाखा इतका होता की, तापमान ४५ ते ४६ अंशांपर्यंत होतं. त्यामुळे सुजय विखे यांनी डोक्यावर पांढरा पंचा गुंडाळला होता.

माजी खासदार प्रीतम मुंडे यांचं भाषण संपल्यानंतर सुजय विखे भाषणासाठी उभे राहिले. तेवढ्यात पंकजा मुंडे स्वतः उठून त्यांच्या जवळ आल्या आणि त्यांनी सुजय विखेंच्या डोक्यावरचा पंचा काढून घेतला. पंकजा मुंडेंच्या या कृतीनंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

विशेष म्हणजे, सुजय विखे यांनाही हसू आवरलं नाही. यानंतर भाषणात त्यांनी मेळाव्याचं कौतुक करत, रखरखत्या उन्हात ५० हजारांहून अधिक लोक उपस्थित असल्याचं सांगितलं. पंकजा मुंडेंची ही कृती तुम्हाला कशी वाटली? कमेंट नक्की करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button