Latest

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेत मोठा बदल… आता शेतकऱ्यांप्रमाणेच ‘या’ लोकांनाही मिळणार दोन लाखांची मदत ! शासनाचा नवा निर्णय काय सांगतो ?

शेती करताना किंवा शेतात काम करताना अपघात झाला, तर आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. मात्र, आता महिला शेतकरी, भूमिहीन शेतमजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही आर्थिक संरक्षण मिळणार आहे.

राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची व्याप्ती वाढवली आहे. या योजनेत १० ते ७५ वर्षे वयोगटातील पात्र सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, तर अपघातामुळे एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपयांचे अनुदान मिळू शकते. दोन्ही डोळे, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपयांची मदत दिली जाते.

रस्ता अपघात, सर्पदंश, विजेचा धक्का, पाण्यात बुडणे, उंचावरून पडणे आणि उष्माघातासह विविध अपघातांचा योजनेत समावेश आहे.
महत्त्वाचं म्हणजे, भूमिहीन शेतमजुरांसाठी ई-श्रम पोर्टलवरील नोंदणी बंधनकारक आहे.

अपघातानंतर प्रस्ताव दोन महिन्यांच्या आत सादर करावा लागणार आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button