
या दिवाळीत पैठणीची खरेदी करायची असेल, तर अहिल्यानगरमध्ये खास संधी तुमची वाट पाहतेय! Dhana’s Paithani घेऊन येत आहे भव्य दिवाळी स्पेशल पैठणी प्रदर्शन व विक्री ! १८ ऑक्टोबर, रविवार रोजी सकाळी १०.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत हे विशेष प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
ठिकाण आहे हॉटेल संकेत, टिळक पथ, स्वास्तिक चौक, अहिल्यानगर. इथे तुम्हाला आकर्षक डिझाईन्स आणि पारंपरिक कलाकुसरीच्या पैठण्या पाहायला मिळणार आहेत. त्यासोबतच पैठणीसोबत मॅचिंग अॅक्सेसरीज, ब्लाऊज, लहान मुलींसाठी खास ड्रेस, आकर्षक पर्स आणि सुंदर कुशन कव्हर्सचीही विविधता उपलब्ध राहणार आहे.
म्हणजेच स्वतःसाठी खरेदी असो, आईसाठी खास भेट असो किंवा दिवाळीत आपल्या माणसांना काहीतरी खास द्यायचं असेल, तर ही संधी चुकवू नका! आणि हो…
हे सगळं तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहे, कारण या प्रदर्शनात आकर्षक डिस्काउंट्सचाही लाभ दिला जाणार आहे. तर १८ ऑक्टोबरची तारीख लक्षात ठेवा आणि दिवाळीच्या खरेदीसाठी नक्की भेट द्या Dhana’s पैठणीच्या या खास प्रदर्शनाला!





