Latest

अहिल्यानगरकरांसाठी मोठी बातमी…; बांधकाम, वॉशिंगसेंटरसाठी पाणी वापरण्याबाबत लागू झालेत नवे नियम, कसे आहेत नवीन नियम ?

दुष्काळी परिस्थिती आणि पाणीसाठ्याची चिंता पाहता अहमदनगर शहरात पाणी वापराबाबत महापालिकेने काटेकोर नियोजन सुरू केले आहे. १६ ऑक्टोबरपासून राज्यात किमान १० टक्के पाणी कपातीचे शासनाचे निर्देश आहेत.

मात्र, नगरकरांच्या दिवसाआडच्या पाणीपुरवठ्यात सध्या कोणताही बदल केला जाणार नाही, अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

वॉशिंग सेंटर, रस्ते, उद्याने आणि बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यावर प्रतिबंध आणला जाणार आहे. त्यासाठी बोअरवेल, विहीर किंवा प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.

शहराला मुळा धरणातून दररोज सुमारे १०० एमएलडी पाणी उचलले जाते, तर नगर शहराला साधारण ७० एमएलडी पाण्याची गरज आहे.

पाइपलाइनमधील गळती रोखणे, महापालिका कनेक्शनला तोट्या बसवणे, टाक्या ओसंडून वाहू न देणे आणि व्यावसायिक आस्थापनांमधील पाणी वापराची तपासणी करण्यावर भर दिला जाणार आहे. पाणी वाचवा, कारण प्रत्येक थेंब आता महत्त्वाचा ठरणार आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button