
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. पण कालपर्यंत ठणठणीत असलेल्या नाना पाटेकरांना अचानक काय झालं?
असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता याबाबत माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील दोना पॉला येथील निवासस्थानी नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत आढळले. छातीत तीव्र वेदना होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वैद्यकीय पथक तातडीने त्यांच्या घरी पोहोचले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती.
घटनास्थळीच त्यांना कार्डियाक मसाज देण्यात आला आणि त्यानंतर मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. सकाळी ५ वाजून २० मिनिटांनी वैद्यकीय पथकाने त्यांना मृत घोषित केले.
तीव्र हृदयविकाराचा झटका हे प्राथमिक कारण सांगितले जात असले, तरी वैद्यकीय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. साधी जीवनशैली, दमदार अभिनय आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या नाना पाटेकर यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.





