
लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं नातं नाही, तर विश्वास, प्रेम आणि अनेक खासगी गोष्टींचं एक सुंदर बंधन आहे. मात्र नकळत काही गोष्टी मित्रांना, नातेवाईकांना किंवा सोशल मीडियावर सांगितल्या जातात. यामुळे नात्यातील विश्वासाला तडा जाऊ शकतो. त्यामुळे नवरा-बायकोने काही गोष्टी दोघांपुरत्याच ठेवणं महत्त्वाचं आहे.
पहिली गोष्ट म्हणजे बेडरूममधील खासगी क्षण. पती-पत्नीमधील जवळीक आणि वैयक्तिक आयुष्याची चर्चा इतरांसोबत करणं टाळावं.
दुसरी गोष्ट म्हणजे जोडीदाराच्या कमकुवत बाजू. त्याने विश्वासाने सांगितलेल्या भीती, अडचणी किंवा वैयक्तिक समस्यांची खिल्ली उडवू नये.
तिसरी गोष्ट म्हणजे दोघांमधील भांडणं. प्रत्येक वादाची माहिती कुटुंबीयांना दिल्यास गैरसमज वाढू शकतात. चौथी गोष्ट म्हणजे घरातील आर्थिक व्यवहार. उत्पन्न, कर्ज आणि बचतीची माहिती विनाकारण बाहेर सांगू नये. आणि पाचवी गोष्ट म्हणजे एकमेकांचे प्रेमाचे मेसेज आणि खासगी गप्पा. परवानगीशिवाय त्या इतरांना दाखवू नयेत.
कारण नातं टिकतं ते केवळ प्रेमाने नाही, तर एकमेकांचा विश्वास आणि गोपनीयता जपण्यानेही!





