
अहिल्यानगरमधील अशोक सहकारी बँकेवर आरबीआयने निर्बंध लागू केल्यानंतर ठेवीदारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. बँकेत तब्बल ४० हजार ठेवीदारांच्या सुमारे ३८० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. यासोबतच ३७९ कोटी रुपयांच्या कर्जवसुलीचे आव्हानही बँकेसमोर आहे.
पाच लाखांपर्यंत ठेवी असलेल्या ३९ हजार ८५० खातेदारांच्या सुमारे २४९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. डीआयसीजीसीच्या विमा संरक्षणातून पात्र ठेवीदारांना रक्कम परत मिळवून देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मात्र सुमारे २१ हजार खातेदारांचे केवायसी अपूर्ण आहे. त्यापैकी १६ हजार खात्यांमध्ये ५०० रुपयांपेक्षा कमी शिल्लक आहे. उर्वरित खातेदारांची केवायसी प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, कर्जवसुलीसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली असून, थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलावाची कार्यवाही सुरू आहे. आरबीआयचे निर्बंध सध्या सहा महिन्यांसाठी असून, या काळातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय होणार आहे.





