Latest

ऑक्टोबरमध्ये बँकांना १६ दिवस सुट्ट्या ! ही पाहा संपूर्ण यादी

ऑक्टोबर महिन्यात बँकेत महत्त्वाचं काम आहे? मग आधीच सुट्ट्यांची यादी पाहून घ्या! नवरात्र, दसरा आणि इतर सणांमुळे ऑक्टोबरमध्ये अनेक दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

२ ऑक्टोबरला गांधी जयंती, ४ ऑक्टोबरला रविवार, १० ऑक्टोबरला दुसरा शनिवार आणि महालया अमावस्या, तर ११ ऑक्टोबरला रविवारची सुट्टी असेल.

१७ ऑक्टोबरला त्रिपुरात महा सप्तमी, १८ ऑक्टोबरला रविवार, १९ ऑक्टोबरला अनेक राज्यांत महाष्टमी, महानवमी आणि दुर्गापूजेनिमित्त बँका बंद राहतील.

२० ऑक्टोबरला महाराष्ट्रासह अनेक राज्यांत विजयादशमी आणि दसऱ्याची सुट्टी आहे. २१ ऑक्टोबरला काही राज्यांत विजयादशमी, तर २२ आणि २३ ऑक्टोबरला सिक्कीममध्ये दुर्गापूजेनिमित्त बँका बंद राहतील.

२४ ऑक्टोबरला चौथा शनिवार, २५ ऑक्टोबरला रविवार, २६ ऑक्टोबरला काही राज्यांत लक्ष्मीपूजा आणि वाल्मीकी जयंती, २९ ऑक्टोबरला हिमाचल प्रदेशात करवा चौथ, तर ३१ ऑक्टोबरला गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंतीची सुट्टी असेल.
लक्षात ठेवा, सर्व सुट्ट्या प्रत्येक राज्यात लागू नाहीत. आणि सुट्टीच्या दिवशी ऑनलाइन बँकिंग आणि UPI सेवा सुरू राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button