Latest

दोन दिवसांपूर्वी घरातून पळाले…. आता एकाच झाडाला दोघांचे मृतदेह……; तरुण-तरुणीच्या संशयास्पद मृत्यूने श्रीगोंद्यात खळबळ ! नेमक घडलं काय ?

अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुण आणि तरुणीचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील वेळू येथील शिवारात बुधवारी, ३० सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. विकास राजू आखाडे आणि गीता अनिल मखाने अशी मृतांची नावे आहेत. दोघेही २२ वर्षांचे असून बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही दोन दिवसांपूर्वी मजुरीसाठी वेळू येथे आले होते. त्यांची राहण्याची व्यवस्था शेतातच करण्यात आली होती. बुधवारी सकाळी इतर मजूर कामावर गेले असता, त्यांना दोघेही झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.

विशेष म्हणजे, गीताचा विवाह झाला होता, तर विकास अविवाहित होता. यापूर्वीही दोघे घरातून निघून गेले होते, अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.

प्रेमसंबंधातून हे पाऊल उचलले की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत. मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button