Latest

गोवंशाची कत्तल करणाऱ्या नगरमधील कुरेशी टोळीवर पोलिसांचे सर्जिकल स्ट्राईक ! थेट संघटित गुन्हेगारीचे वाढीव कलम, नेमक प्रकरण काय ?

अहिल्यानगरमध्ये वारंवार गोवंशीय जनावरांची कत्तल आणि गोमांस विक्री करणाऱ्या कुरेशी टोळीवर आता पोलिसांनी थेट संघटित गुन्हेगारीचं कलम लावलंय !

मंडळी, अहिल्यानगरच्या कोठला परिसरातील कुरेशी टोळीविरोधात तोफखाना पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. २२ सप्टेंबर रोजी मस्तान शहा चौक परिसरात छापा टाकून पोलिसांनी तब्बल २७०० किलो गोमांस जप्त केलं होतं. याची किंमत ५ लाख ४० हजार रुपये असून, चार सत्तूर, पाच धारदार चाकू आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे असा एकूण ५ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणात समीर बाबुलाल कुरेशी, नूर लाल सय्यद आणि जगदीश उर्फ सोनू कमद दास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान सामी समीर कुरेशी, आबेद बाबुलाल कुरेशी आणि मुजाहित उर्फ भा. कुरेशी यांचीही नावे गुन्ह्यात वाढवण्यात आली.

विशेष म्हणजे, वारंवार अटक होऊनही जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा गुन्हे केल्याचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचं कलम १११ अर्थात संघटित गुन्हेगारीचं वाढीव कलम लावलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button