Latest

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! पीक पंचनाम्याच्या नियमांमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा बदल….सरपंच किंवा पोलीस पाटील नाही तर आता…..

मंडळी, दुष्काळामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे ! खरीप पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करताना आता संबंधित शेतकऱ्याची स्वाक्षरी घेण्यात येणार आहे. यापूर्वी पंचनाम्यावर सरपंच किंवा पोलिस पाटील यांच्यापैकी एकाची सही घेतली जात होती. मात्र, पंचनाम्यातील चुका टाळण्यासाठी आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

राज्यातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही सुरू झाली असून, शेतकऱ्याचे नाव, एकूण क्षेत्र, बाधित गट क्रमांक, पिकाचे नाव, नुकसानाची टक्केवारी आणि बँक खात्याची माहिती नोंदवली जाणार आहे. विशेष म्हणजे, पंचनाम्यावर शेतकऱ्याची सहीही अनिवार्य असेल.

दरम्यान, दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारही पाहणी पथके पाठवणार आहे. त्यामुळे आता पंचनामे आणि केंद्राच्या पाहणीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button