Latest

कोपरगावात भुताचा फोटो व्हायरल ; सफेद साडीच्या भुताचा शोध घेतला आणि समोर आलं धक्कादायक सत्य ! त्या अमावस्येच्या रात्री नेमक काय घडलं?

भूताच्या अफवेने कोपरगाव हादरलं… पण तपासात समोर आलं धक्कादायक सत्य! कोपरगावच्या बेट परिसरात सोमवारी रात्री ‘भूत निघालं’ अशी अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली. सफेद साडीतील एका महिलेचे विचित्र फोटो व्हायरल झाले.

या महिलेने एका व्यक्तीवर हल्ला करून त्याला जखमी केल्याची चर्चाही रंगली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कोपरगाव पोलिसांनी केलेल्या तपासात या चर्चेचं सत्य समोर आलं.

संबंधित व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात चौकशी केली असता अशी कोणतीही व्यक्ती दाखल नसल्याचं स्पष्ट झालं. यानंतर बेट परिसरात चौकशी करण्यात आली आणि पोलिसांची मदत घेण्यात आली.

फोटो पुढे पाठवणाऱ्या काही नागरिकांची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत हे फोटो अमावस्येच्या रात्री शिर्डीहून पुढे पाठवले गेल्याचं समोर आलं. अंधश्रद्धेपेक्षा सत्य पडताळा आणि सोशल मीडियावरील फोटो-व्हिडिओ खात्रीशिवाय पुढे पाठवू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button