Latest

श्रीगोंद्यातील दोन चिमुरड्यांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट ! आंदोलकांवरच गुन्हे दाखल

श्रीगोंद्यातील दोन चिमुरड्यांच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या रुग्णवाहिका वादाला आता नवे वळण लागले आहे. आंदोलन करणाऱ्यांवरच गुन्हे दाखल झाल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.

मंडळी, श्रीगोंदे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ प्राथमिक आरोग्य केंद्रात १०२ रुग्णवाहिका न दिल्याबाबत आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, सिमतल वाबळे आणि इतर १० ते १५ जणांविरोधात श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैला डांगे यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा, धमकी आणि इतर विविध कलमांखाली ही कारवाई करण्यात आली.

फिर्यादीनुसार, आंदोलकांनी आरोग्य केंद्रासमोर गोंधळ घालत केंद्राला बाहेरून कुलूप ठोकले आणि कर्मचाऱ्यांना आत अडकवले. तसेच डॉ. डांगे यांना धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, दोन चिमुरड्या मुलींच्या मृत्यूप्रकरणी डॉ. प्रशांत मुळे आणि डॉ. शैला डांगे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी २७ जुलै रोजी तहसीलदार कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बाळासाहेब नाहाटा यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button