
मंडळी, गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरमधील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच आता शहरातील माळीवाडा परिसरात ३० वर्षीय कृष्णा खंडूअप्पा भागांगरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद माहितीनुसार मित्राकडून वाद सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृष्णा भागांगरे घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना शिवीगाळ करण्यात आली आणि “आण रे तो पिस्टल… यांच्या एकाला संपविले आहे, यालाही संपवून टाकू,” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी केरप्पा हुच्चे उर्फ भाऊ, विशाला उर्फ बंडू हुच्चे, सुजाता हुच्चे आणि चार अनोळखी व्यक्तींविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी फिर्याद नोंदवून पुढील तपास सुरू केला असून, या घटनेमागील नेमके कारण आणि पुढे काय कारवाई होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





